शेतात तुंबलेल्‍या पाण्यातच जलसमाधी आंदोलन; पंचनाम्‍यांना होतेय दिरंगाई

शेतात तुंबलेल्‍या पाण्यातच जलसमाधी आंदोलन; पंचनाम्‍यांना होतेय दिरंगाई
Buldhana News Farmer
Buldhana News FarmerSaam tv
Published On

बुलढाणा : सलग चाललेल्‍या पावसामुळे शेताचे तळे झाले आहे. या पावसाने शेतातील पिके कुजून बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी देखील अद्यापपर्यंत शासकिय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी (Buldhana) बांधावर पोहोचलेले नाही. यामुळे स्वाभिमानीने तुंबलेल्‍या पाण्यातच जलसमाधी आंदोलन केले. (Buldhana News Farmer Crop Damage)

Buldhana News Farmer
जामखेडी धरण वाहतेय ओसंडून; यु आकाराचा सांडवा आकर्षणाचा केंद्रबिंदू

गेल्या सहा दिवसात झालेल्या (Heavy Rain) अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. शेकडो शेतकाऱ्यांचे (Farmer) उभे पीक अतिपाण्यामुळे सडले आहे. पण अद्याप कुणीही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला नाही. शिवाय शेतकऱ्यांना नुकसान झाल्याची मदत जाहीर केली नाही.

जिल्ह्यात कुठेही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेतात शेकडो शेतकरी तुंबलेल्या चार फूट पाण्यात आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत याठिकाणी जिल्ह्याचे किंवा मतदार संघाचे आमदार या ठिकाणी येत नाही; तोपर्यंत पाण्यातून हे शेतकरी उठणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com