बीड : बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजारो हेक्टरवरील काढणीला आलेले पीक पाण्यात गेले आहे. सोयाबीन, बाजरी, वेचणीला आलेला (Cotton) कापूस, तुर या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतात काहीच राहिले नाही, म्हणत सांगा मायबाप सरकार आम्ही दिवाळी साजरी करायची कशी? अशी आर्त हाक (Farmer) शेतकऱ्यांनी दिली. (Tajya Batmya)
हातातोंडाशी आलेला घास (Rain) पावसाने हिरावल्याचे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सतत सूरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेले आहेत. त्यामूळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. बीडच्या (Beed News) बेलापूरी शिदोड परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेतल्या.
शंभर टक्के मदतीचे आदेश द्या
आसमानी आणि सुलतानी संकटांनंतर ऐन काढणीच्या वेळीच अक्षरशः कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती झाल्याचे चित्र आहे. सर्वच पिकांचे संपुर्णत: नुकसान झाले आहे. शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत करून विमा कंपनीला देखील शंभर टक्के मदत करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. दरम्यान प्रशासनाने पंचनाम्याचा घाट न घालता शेतकऱ्यांना सरसगट दीड लाख रुपये हेक्टरी मदत करा. अशी मागणी शिवसेना किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते यांनी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.