Beed : ग्रामीण भागातील हुर्डा पार्ट्यांमुळे स्थानिकांना मिळतोय रोजगार!

शेतातील ज्वारी बहरात आल्यानं खवय्यांना हुर्डा पार्टीचे (Hurda Party) वेध लागले आहे.
hurda party
hurda party SaamTv
Published On

बीड : "ज्वारी बहरात, हुरडा पार्ट्या जोरात' अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. डिसेंबरच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतातील ज्वारी बहरात येते. शेतातील ज्वारी बहरात आल्यानं खवय्यांना हुर्डा पार्टीचे (Hurda Party) वेध लागले आहे. गुलाबी थंडीत सध्या बीड (Beed) मध्ये हुर्डा पार्टीची रेलचेल सुरू झालीय. चुलीवरच्या गरमा गरम बाजरीच्या भाकऱ्या, पिठलं, थालीपीठ, झणझणीत ठेचा अशा गावरान मेव्याची चव पर्यटकांना चाखायला मिळत आहे.

हे देखील पहा :

बीड बायपास जवळील हिरकणी हुर्डा केंद्रावर, केवळ मराठवाडाच (Marathwada) नाही तर इतर राज्यातील पर्यटक गर्दी करत आहेत. मुलांच्या खेळण्याची सोय असल्यानं, लहानगे देखील याचा मनमुराद आनंद लुटतायत. इथला सेल्फी पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतोय, दुष्काळी बीड जिल्ह्यात हे चित्र समाधान देणार आहे.

hurda party
अडीच कोटींच्या हारवेस्टरपायी शेतकऱ्यांनी विकली 17 एकर जमीन; कंपनीकडून फसवणूक!

गत दोन वर्षांपासून हुरडा पार्टीवर निर्बंध होते. परंतु, यंदा हुर्डा पार्टीचा आस्वाद घेता येत असल्यानं, पर्यटक (Tourist) देखील मोठ्या उत्साहाने यात सहभागी होताना दिसून येत आहे. तर, दुष्काळी मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळत असल्यानं त्यांच्यात देखील उत्साह दिसून येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com