कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - पालकमंत्री बच्चू कडू

अकोला जिल्ह्यात काल अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले.
मंत्री बच्चू कडू
मंत्री बच्चू कडूSaam Tv
Published On

अकोला : अकोला जिल्ह्यात काल अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. पावसाने अकोला जिल्ह्याला झोडपत शेती पिकांसह फळ पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. खरीपातील तुर व कपाशी तर रब्बीतील हरबरा,गहु व ज्वारी तसेच फळ पिकांना मोठा फटका बसलाय. जिल्ह्यातील अकोला (Akola), मुर्तिजापूर,पातुर, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, अकोट तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा :

रब्बीच्या सुरवातीलाच गारपिटीमुळे रब्बी हंगामावरही आता अनिश्चिततेचे सावट आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने महसूल विभाग, पिक वीमा कंपनी, कृषी विभाग यांच्या संयुक्तरीत्या नुकसान झालेल्या पिकांचे सर्व्हे करावे आणि शेतकऱ्यांना शेत नुकसानाची (Crop Damage) भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मंत्री बच्चू कडू
१५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्यासाठी पालिकेचा ऍक्शन प्लॅन तयार!

दरम्यान, यासंदर्भात अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचा आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे. मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी (Farmers) सुटणार नाही अशी ग्वाहीही पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com