Farmer Success Story: अकोल्यात गावरान अंडीचा 'VLE' ब्रँड; महिन्याला ९० हजाराची उलाढाल

Akola News : अकोल्यात गावरान अंडीचा 'VLE' ब्रँड; महिन्याला ९० हजाराची उलाढाल
Farmer Success Story
Farmer Success StorySaam tv

हर्षदा सोनोने 
अकोला
: नुसती शेती करणे आता परवडणारे नाही. यामुळे अनेकजण शेतीला जोडधंदा सुरु करत असतात. असाच शेतीला जोडधंदा म्हणून एका (Farmer) शेतकऱ्याने व्यवसाय सुरू केला. कोंबडी पालन व्यवसाय (Akola) सुरु केला. या व्यवसायातून महिन्याला तब्बल ८० ते ९० हजार रूपयांची उलाढाल गजानन अंधारे हे शेतकरी करत आहे. (Tajya Batmya)

Farmer Success Story
Ganpat Gaikwad News : नाना पाटेकरांच्या वक्तव्याचे गणपत गायकवाडांकडून समर्थन; महापालिकेवर केला भ्रष्टाचाराचा आरोप

पातुर तालुक्यातील शिर्ला अंधारे येथील गजानन अंधारे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून अकरा महिन्यांपूर्वी देशी कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरु केला. अन् या व्यवसायातून त्यांनी यशाचं शिखर गाठलं असून अंधारे यांचा हा व्यवसाय आता देशी कोंबड्यांची अंडी निर्माण करणारा तालुक्यातील मोठा व्यवसाय ठरत आहे. त्यांची वार्षिक उलाढाल आणि कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बदललेली आहे. गजानन अंधारे बीएस्सी बायोलॉजीच शिक्षण घेतलं असून, शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. या शेतीतून ते भाजीपाल्यासोबतच पारंपारिक पिके घ्यायचे. मात्र त्यांना उद्योग- व्यवसाय खुणावत होता. म्हणून त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून नोव्हेंबर २०२२ मध्ये गावराण (देशी) कोंबड्या पालनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी २८ हजार रुपयांमध्ये एक हजार देशी कोंबड्या विकत आणले. त्यांचे संगोपन करण्यासाठी प्रति कोंबडीला ३५ ते ४० रुपये खर्च येतो. एक हजार कोंबड्यांपैकी पाचशे कोंबड्या त्यांनी ऐक ते सव्वा किलोच्या झाल्यानंतर विक्री केल्या आणि या व्यवसायातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागल्यानंतर व्यवसाय वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Farmer Success Story
Jalgaon News : सैन्यदल भरतीत अपयश; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

५०० हुन अधिक देशी कोंबड्या 
गजानन अंधारे यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी सुरुवातीला १ ते दीड लाख रुपये खर्च करुन शेतातील २० गूंठे म्हणजेच अर्धा एकरमध्ये टिनशेड उभे केले. यात १ हजार पिल्लांचे संगोपन सुरु केले आणि चार महिन्यांनंतर यातील पाचशे कोंबड्यांची विक्री केली. त्याला भाव देखील चांगला मिळाला असून लाख रुपयांच्या वर नफा मिळाला. तर पुढे त्यांनी देशी कोंबडीच्या अंडीची अस्सल चव असलेल्या गावरान अंडी हा ब्रँड त्यांनी उदयास आणला. आज संपूर्ण पातुर तालुक्यात त्याच्या गावरान अंडीची मागणी होत असून अंधारे यांच्या पोल्ट्रीफ्रॉममध्ये सद्यस्थितीत पाचशेच्या जवळपास देशी कोंबड्या आहेत. तर या कोंबड्यांपासून दररोज १५० ते २०० अंडी मिळत आहेत. 

'VLE' ब्रॅंडने अंडी विक्री 
अंधारे यांनी 'गावरान अंडी' VLE (Village Life Eggs) या नावाच्या ब्रँडने त्यांनी अंडी विकायला सुरुवात केली. आता हळूहळू त्यांचा गावरान अंडीचा व्यवसाय हा विस्तारला असून आता जिल्हातील पातुर, अकोला, वाडेगाव, बाळापुर, कापशी, चिखलगाव, पिंजर, बार्शीटाकळी सारख्या ठिकाणी अंडी विक्री होत आहे. अंधारे यांनी गावरान अंडी' VLE चा शेतीला जोडक धंदा सुरू केल्याने आज अंधारे हे शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com