पूर्णा नदीला पूर ! घुंगशी बॅरेजचे दहा दरवाजे उघडले

गेल्या दोन दिवसांपासून मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
पूर्णा नदीला पूर; घुंगशी बॅरेजचे दहा दरवाजे उघडले
पूर्णा नदीला पूर; घुंगशी बॅरेजचे दहा दरवाजे उघडलेजयेश गावंडे
Published On

अकोला: पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे घुंगशी बॅरेजचे आज दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज हे दरवाजे उघडले असून पूर पातळी 256.50 मी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे घुंगशी ब्यारेजची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे सर्व दहा व्दारेवर उचलून ठेवण्यात आली आहेत. पूर्णा नदीला रविवारी दुपारी चार वाजतापासून पूर आलेला आहे.

पूर पातळी 256.50 मी आहे. यामुळे गेटमधून पूराचे पाणी वाहत आहे. पूर विसर्ग 1800 घमीप्रसें आहे. दरम्यान, बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्याआधी प्रशासनाने बॅरेजजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, तूर सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. आधीच पावसाच्या खंडामुळे शेतकरी त्यात त्रस्त झाले होते, हे विशेष.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com