सोशल मीडियावर एका नर्सचा फोटो व्हायरल होतोय.या फोटोत बघा, नर्सच्या चेहऱ्यावर जखम झाल्याचं स्पष्ट दिसतंय.या नर्सला 24-24 तास काम करावं लागत असल्याने चेहऱ्यावर जखम झाल्याचा दावा केला जातोय.जास्तवेळ काम केल्याने नर्सच्या चेहऱ्याला जखम झाल्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जातेय.पण, खरंच या नर्सने चेहऱ्यावर जास्तवेळ मास्क लावून काम केल्याने जखम झालीय का ? हा फोटो खरंच नर्सचा आहे का ? याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय वाचा सविस्तर.
व्हायरल मेसेज
ही नर्स तोंडाला मास्क लावूनच झोपलीय.24-24 तास काम करावं लागत असल्याने नर्सच्या चेहऱ्याला जखम झालीय
हा मेसेज फोटोसह व्हायरल होत असल्याने नक्की हा फोटो आहे तरी कुठला ? ही नर्स कोणत्या देशातील आहे ? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.या फोटोची पडताळणी करत असताना अनेक फोटो सापडले.त्यावेळी हा फोटो व्हायरल होण्यामागचं खरं कारण काय यामागचं सत्य समोर आलं.
हा व्हायरल फोटो इटलीच्या लोम्बार्डीतील हॉस्पिटलमधील नर्सचा आहे.एलेसिया बोनारी असं नर्सचं नाव असून, मास्कमुळे तिच्या चेहऱ्यावर जखम झालीय.पण, तरीदेखील मी थकली नसून, एका दुश्मनाशी म्हणजेच कोरोनाशी लढत असल्याचं तिने सांगितलं.एलेसियाच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.त्यामुळं आमच्या पडताळणीत कोरोना पेशंटवर उपचार करणाऱ्या नर्सच्या चेहऱ्यावर जखम झाल्याचा दावा सत्य ठरला.
web title : viral satya corona virus health workers exhausted italy nurse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.