मुंबई : विरार येथे आज पहाटे लागलेल्या आगीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना समजताच दुसऱ्या रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या त्या व्यक्तीच्या पत्नीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना कळताच या दांपत्याच्या नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे.Wife died after hearing news of Husbands death in virar fire
नाशिकमध्ये Nashik आॅक्सिजन गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पहाटे विरार Virar येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागाला आग Fire लागून त्यात १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Fire Broke out at virar Hospital Thirteen Patients died
विरार पश्चिम येथे हे कोविड Covid 19 रुग्णालय आहे. त्यात पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. त्यात एकूण १७ रुग्ण अडकले होते. अग्निशमन दल Fire Brigage आणि पोलिसांनी Police आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याची सुरवात केली. Wife died after hearing news of Husbands death in virar fire
या घटनेत वसईच्या १०० फूट रोड परिसरात राहणाऱ्या कुमार दोशी या ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी चांदनी विरारच्या जीवदानी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत होती. त्यांना आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची घटना समजल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांना मृत्यू झाला.
Edited By - Amit Golwalkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.