Water Bicycle Video: अरेच्चा! पाण्यावर चालणारी सायकल; पठ्ठ्याचा देसी जुगाड सोशल मीडियावर VIRAL

Water Bicycle Viral Video: एकच नंबर! भावाचा जबरदस्त जुगाड; स्वत: बनवली पाण्यावर चालणारी सायकल, व्हिडीओ VIRAL
Water Bicycle Video
Water Bicycle VideoSaam TV
Published On

Viral Video:

नदी, समुद्र किंवा एखाद्या तलावात एका काठावरून दुसरीकडे जाण्यासाठी बोट, जहाज, होडी यांचा उपयोग केला जातो. आजवर तुम्ही देखील यांमधून प्रवास केला असेल. मात्र तुम्ही सायकलवरून कधी नदीत किंवा तलावात प्रवास केला आहे का? एका तरुणाने अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य केलीये. (Latest Marathi News)

Water Bicycle Video
#Shorts : Aamir Khan Video: "नशेत आहेस का?" जिनिलीयाला पाहताच आमिर खानचा तोल गेला, Video Viral

तरुणाने चक्क सायकलवरून पाण्यात प्रवास केलाय. त्याने स्वत: पाण्यात चालणारी सायकल बनवली आहे. सायकलीचा तरुणाने व्हिडीओ देखील रेकॉर्ड केलाय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण अगदी सहज पाण्यात मधोमध सायकल चालवतोय.

सायकल पाण्यात नेल्यानंतर आतमध्ये बुडून जाते. सायकल कधीही पाण्यावर तरंगत नाही. मात्र ही सायकल पाण्यावर तरंगावी आणि तिने प्रवास करता यावा यासाठी तरुणाने सायकलचे टायर बदलले आहेत. सायकलचे टायर बदलून त्याने येथे एअर ट्यूब टायर बसवलेत. या टायरच्या सहाय्याने तरुणाची सायकल पाण्यात खाली पडत नाही.

टायरच्या मदतीने सायकल पाण्यावर चालते. विरेंद्र सिंह असं या तरुणाचं नाव आहे. तो नेहमीच काहीतरी अतरंगी गोष्टींचा शोध घेत असतो. याआधी त्याने ८ चाकांची चारचाकी बनवली होती. विरेंद्रचा हा जुगाडही नेटकऱ्यांना फार आवडला होता. आता देखील त्याने सायकल खरेदी केलीये. पाण्यात प्रवास करण्यासाठी तरुणाचा हा जुगाड देखील नेटकऱ्यांना आवडलाय.

आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूव्ह्ज मिळालेत. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंटही केल्यात. एकाने कमेंटमध्ये तरुणाचं कौतुक केलंय. तर आणखी एका तरुणाने त्याला लहान प्लॅस्टीकचे टायर वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Water Bicycle Video
Viral Video: पुष्पगुच्छ द्यायला उशीर... मंत्र्याने अंगरक्षकाच्या कानाखाली लगावली; संतापजनक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com