Shark Attack Viral Video: शार्कचा बापासमोरच मुलावर हल्ला! धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Shark Attack Shocking Video: या घटनेनंतर इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने येथील 74 किमीचा समुद्र किनारा पुढील 2 दिवसांसाठी बंद केला आहे.
Viral Video shark attacked on youth
Viral Video shark attacked on youthsaam tv
Published On

Shark Attacked On Youth Video: इजिप्तच्या हुरघाडा येथे एका रशियन पर्यटकावर टायगर शार्कने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार या हल्ल्यात आणखी दोन पर्यटक जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे या शार्कने तरुणावर हल्ला केला तेव्हा त्याचे वडिल समुद्राच्या किनाऱ्यावर उपस्थित होते आणि त्यांच्या डोळ्यासमोर हा संपूर्ण प्रकार घडला ही अतिशय वेदनादायी घटना होती. या घटनेनंतर इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने येथील 74 किमीचा समुद्र किनारा पुढील 2 दिवसांसाठी बंद केला आहे.

Viral Video shark attacked on youth
Amit Shah on Uddhav Thackeray: 'फडणवीस मुख्यमंत्री होतील, उद्धव ठाकरे यांनी केलं होतं मान्य', अमित शाह यांचा गौप्यस्फोट

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर शार्कला पकडून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. तिथे त्याने पर्यटकावर हल्ला का केला याचा तपास केला जाईल. शार्क सहसा रेड सी कोस्टल भागात हल्ला करत नाहीत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Breaking News)

शार्कच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रशियन पर्यटकाचे नाव व्लादिमीर पोपोव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आम्ही पोपोव्हला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व फार कमी वेळात घडलंय. पाण्यात हालचाल होताच मला तो शार्क असल्याचा संशय आला. इतर लोकांना शार्कबद्दल सावध करण्यासाठी मी ताबडतोब किनाऱ्यावर आलो. बचावकर्त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत शार्कने हल्ला केला होता. (Viral Video)

Viral Video shark attacked on youth
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फक्त एकच पॅटर्न चालतो, तो मोदींनी आणलाय; देवेंद्र फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

महिनाभरापूर्वीच एका बोटीवर शार्कचा हल्ला

अमेरिकेतील हवाईमधील ओहू बेटावर 12 मे रोजी टायगर शार्कने एका बोटीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. बोटमॅनने शार्कला हकलून लावण्याचा प्रयत्न केला (Viral News). त्यानंतर शार्क काही वेळाने बोटीपासून दूर गेली. नॅशनल जिओग्राफिकच्या मते, मानवांवर हल्ला करण्याच्या बाबतीत टायगर शार्क पांढऱ्या शार्कनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पांढऱ्या शार्कप्रमाणे ते माणसावर हल्ला करून पळून जात नाहीत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com