Viral Python Video: पिंजरा उघडताच अजगराने धरला महिलेचा हात, पुढं जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

Snake Viral Video: पिंजरा उघडताच अजगराने धरला महिलेचा हात, पुढं जे घडलं ते पाहून उडेल थरकाप
Viral Python Video
Viral Python VideoSaam Tv

Viral Python Video: आजकाल बहुतेक लोकांना कुत्री, मांजर किंवा पक्षी पाळणे आवडते. परंतु काही लोक असेही अहेत ज्यांना धोकादायक प्राणी पाळण्याची आवड आहे. उदाहरणार्थ, साप. साप पाळणं हे प्रत्येकाला शक्य होईल, अशी गोष्ट नाही. कारण साप पाळणं हे कधी प्राणघातक ठरेल, हे सांगता येत नाही. तरीही काही लोक असे प्राणी पाळतात.

नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये पाळीव अजगर एका महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सचाही थरकाप उडाला आहे.

Viral Python Video
Viral Snake Kiss Video: अबब! चक्क 12 फुटांच्या किंग कोब्राचं घेतलं चुंबन, व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा

या व्हिडीओत एक महिला काचेच्या पेटीतून अजगराला बाहेर काढत असताना अचानक तो तिच्यावर हल्ला करता दिसत आहे. व्हिडीओत अजगर महिलेच्या हाताला तसेच तिच्या पायाला घट्ट विळखा घालून बसल्याचं दिसत आहे. अजगराच्या विळख्यातून सुटण्यासाठी महिलेचा मित्रही तिला मदत करता दिसत आहे. मात्र हे दोघांनाही अजगरचा विळखा काही केल्या सोडवता येत नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.  (Latest Marathi News)

हा व्हिडीओ पाहून असे दिसते की, अजगर पाळणे ही महिलेची मोठी चूक ठरली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर 'डेली लाऊड' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका खोलीत एक्वैरियमसारखा काचेचा पिंजरा (snake in cage viral video) दिसत आहे. (Viral Video)

Viral Python Video
Solapur BJP Leader joined Congress: सोलापुरात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने भाजपची सोडली साथ, काँग्रेसचा पकडला हात

पिंजऱ्यात एक मोठा अजगर आहे. व्हिडीओमध्ये महिलेने पिंजऱ्याचा वरचा भाग उघडताच (python grab owner hand video) त्यातून अजगर बाहेर पडू लागतो. यादरम्यान महिला अजगराच्या डोक्याला प्रेमाने स्पर्श करत असताना अचानक अजगराने तिच्या हातावर हल्ला करून तिला घट्ट पकडले. त्याची पकड इतकी मजबूत आहे की त्यातून सुटका होणे जवळजवळ अशक्य वाटते. यादरम्यान एक व्यक्तीही महिलेच्या मदतीसाठी तेथे पोहोचते. यादरम्यान खूप प्रयत्न करूनही अजगर महिलेचा हात सोडत नाही आणि उलटा पायही धरतो.  (Viral Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com