Viral Video: बापरे! तरुणाने घेतले चक्क वाघाचे चुंबन अन् पुढे जे घडले... धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Viral: सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे, कारण अशी दृश्ये क्वचितच पाहायला मिळतात. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला एका भयंकर वाघासोबत खेळताना दिसतोय. हे पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत.
Man And Tiger
अविश्वसनीय! वाघाच्या ओठांवर चुंबन घेताना दिसला माणूस, पाहा हा धक्कादायक व्हिडिओSaam Tv
Published On

सोशल मीडियावर सध्या एक अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका भयंकर वाघाच्या ओठांवर वारंवार चुंबन घेत आहे आणि कोणत्याही भीतीशिवाय त्याच्याशी मजा करताना दिसत आहे. होय तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. कारण अशी दृश्ये क्वचितच पहायला मिळतात.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक प्रौढ वाघ जमिनीवर उलटा पडलेला दिसतो, आणि एक माणूस त्याला मानेने धरून उचलतो. विशेष म्हणजे, तो नंतर वाघाच्या ओठांचे चुंबन घेऊ लागतो. हे दृश्य पाहून अनेकांना वाटू शकते की हा माणूस मोठ्या संकटात सापडणार आहे, कारण वाघ हा एक अत्यंत शक्तिशाली आणि संभाव्यतः धोकादायक वन्य प्राणी आहे. सामान्यतः, नरभक्षक वाघ अशी परिस्थिती असती तर त्याने लगेचच त्या व्यक्तीवर हल्ला केला असता. मात्र, हा वाघ त्या माणसाशी अत्यंत मैत्रीपूर्ण आणि खेळकर वागतो.

या व्हिडिओमध्ये एक वाघ आणि एक माणूस यांच्यातील अनोखे नाते दिसून येते. व्हिडिओमध्ये वाघ हा त्या क्षणाचा पूर्ण आनंद घेत असल्याचे दिसते. तो माणूस वाघाचे चुंबन घेतल्यानंतर त्याला लहान मुलाप्रमाणे गुदगुल्या करतो, आणि विशेष म्हणजे, हा क्रूर शिकारीही या क्षणाचा आनंद घेतो. वाघाची ही कृती पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.

एका व्यक्तीच्या कृतीला शौर्य म्हणायचे की मूर्खपणा, हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे. सध्या एका व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे, आणि तो पाहून अनेक नेटिझन्स थक्क झाले आहेत. ३१ मार्च रोजी @wild_animalsgram या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या पोस्टला आतापर्यंत १० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटिझन्स आश्चर्यचकित होऊन त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Man And Tiger
Viral Video: धावत्या लोकलमध्ये मर्यादा ओलांडली! तरुण-तरुणीने प्रवाशांसमोर असं काही केलं की नेटकरी संतापले; VIDEO

एका युजरने कमेंट केली, जर वाघाला हवे असेल तर तो एका फटक्यात माणसाची कवटी फाडू शकतो, पण मी काय पाहत आहे? तो या माणसासमोर ओल्या मांजरीसारखा झाला. दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, तुम्ही कितीही मित्र बनवले तरी ते नेहमीच वाइल्ड राहतील. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, हे करण्यासाठी धाडस लागते. चौथ्या वापरकर्त्याने कमेंट केली, सुंदर आणि भयानक नाते.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com