Viral Video: जावई पडला सासूच्या प्रेमात, सासऱ्याने असं काही केलं की संपूर्ण गाव करतंय कौतुक

Bihar Wedding Viral Video: बिहारच्या बांकामध्ये ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणारी एक व्यक्ती आपल्या सासूच्याच प्रेमात पडली. मग या व्यक्तीने थेट सासूसोबत लग्न केले. संपूर्ण गावासमोर सासूच्या भांगेमध्ये कंकू भरून या व्यक्तीने लग्न केले.
Bihar Wedding Video
Bihar Wedding Video Saam Tv

कधी कोण कोणाच्या प्रेमात पडेल सांगता येत नाही. प्रेमात येऊन माणूस कोणतीही सीमा पार करायला तयार असतो. सासूच्या प्रेमात पडलेल्या जावयाने संपूर्ण गावाच्या समोर तिच्यासोबत लग्न केलं. बिहारमध्ये (Bihar) ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

बिहारच्या बांकामध्ये ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणारी एक व्यक्ती आपल्या सासूच्याच प्रेमात पडली. मग या व्यक्तीने थेट सासूसोबत लग्न केले. संपूर्ण गावासमोर सासूच्या भांगेमध्ये कंकू भरून या व्यक्तीने लग्न केले. जावई आणि आपल्या बायकोचे प्रेम असल्याचे कळताच सासऱ्यानेच आनंदात या दोघांचे लग्न लावून दिले. या व्यक्तीने सासूसोबत लग्न केले हे संपूर्ण गावाने देखील स्वीकार केले.

Bihar Wedding Video
Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जावई आणि सासू संपूर्ण गावाच्या समोर गर्दीमध्ये उभे राहिले आहेत. या व्यक्तीचा सासरा देखील याठिकाणी उभा राहिलेला दिसत आहे. गर्दी बघून नेमकं या ठिकाणी काय चालले आहे हेच कळत नाही. त्यानंतर हळूहळू समजते की सासराच आपली पत्नी आणि जावयाचे लग्न लावून देत आहे. गावकऱ्यांच्या समोर जावयाने सासूच्या भांगेमध्ये कंकू भरले आणि लग्न केले.

जावयाने सासूच्या भांगेमध्ये कंकू भरल्यानंतर गावातील सर्व महिला, लहान मुलं आणि इतर लोकं टाळ्या वाजवतात. अशातच एक महिला म्हणते याचा व्हिडीओ बनवा. गर्दीमधील एका व्यक्तीने या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ तयार केला असून तो सोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Bihar Wedding Video
Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

जावई आणि सासू यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सासरच्या मंडळींना हा प्रकार कळताच त्यांनी दोघांचेही त्यांच्या इच्छेनुसार लग्न लावून दिले. सासऱ्याच्या निर्णयाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे. आता या व्हिडिओच्या तारखेबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे @gharkekalesh नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. २१ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

Bihar Wedding Video
Teacher Fight Video: शाळेत तुफान राडा; शिक्षिका आणि मुख्यध्यापिकेमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com