Viral Video: रस्त्यावर धावली अनोखी बेड कार, व्हिडिओने नेटकऱ्यांना भुरळ घातली

Bed Car: सध्या एका तरुणाचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो तरुण जुगाड करून त्याच्या बेडला कारमध्ये रूपांतरित करतो. हे पाहिल्यानंतर लोकांना खूप आश्चर्य वाटते कारण अशी कार यापूर्वी कोणीही पाहिली नाही.
Bed Car
रस्त्यावर धावली अनोखी बेड कार, व्हिडिओने नेटकऱ्यांना भुरळ घातलीSaam Tv
Published On

सोशल मीडियावर अनेक वेळा असे काही व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. सध्या अशाच एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्यात एका साध्या बेडमध्ये अनोखा जुगाड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा बेड केवळ झोपण्यासाठीच नाही, तर त्यामध्ये अनेक बदल केले गेले आहेत. हे पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, म्हणून लागले असे कोण करतो का भाऊ? कारण हा व्हिडिओ आहेच एवढा भन्नाट.

आपल्या देशात, पदवी नसलेले पण कौशल्याने परिपूर्ण असे अनेक अभियंते आढळतात, जे आपल्या कल्पकतेने आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी निर्माण करतात. अशाच एका अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एका तरूणाने साध्या बेडला चारचाकी गाडीत रूपांतरित केले आहे. रस्त्याच्या मध्यभागी हा हलणारा बेड पाहून लोक थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे, ड्रायव्हिंगसाठी मध्यभागी एक जागा सोडण्यात आली असून, त्या जागेत बसून तो तरूण संपूर्ण बेड चालवतो.

व्हिडिओ येथे पाहा

तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की, एक तरूण रस्त्यावर आनंदाने बेड चालवताना दिसत आहे. हो अगदी बरोबर वाचलं. हा अनोखा शोध पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण असे वाहन यापूर्वी कधीही रस्त्यावर दिसले नव्हते. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की त्या व्यक्तीने बेडच्या फ्रेममध्ये गाडीची चाके, मोटर आणि स्टीअरिंग बसवले आहे. त्यामुळे तो रस्त्यावर अगदी सहज आणि आनंदाने हे अनोखे वाहन चालवताना दिसत आहे. रस्त्यावर असे जुगाड पाहून लोक विस्मयचकित झाले आहेत आणि या अनोख्या जुगाडाचे कौतुक देखील करत आहेत.

Edited By - Purva Palande

Bed Car
Viral Video: पोलिसाच्या बायकोने भररस्त्यावर रिल केला, ट्रॅफिक जाम झालं; नवऱ्याची नोकरी गेली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com