
आजच्या काळात भारतीय लग्न डान्स शिवाय पूर्ण होतच नाही आणि आता तर वधू वर देखील या कार्यक्रमाला खास आकर्षण बनण्यासाठी अनोख्या पद्धतीने डान्स करतात. जे पाहिल्यानंतर अनेकदा लोक आश्चर्यचकित होतात. सध्या सोशल मीडियावर एका वराचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.
खूपदा तुम्ही पाहिले असेल की जेव्हा नवरा आपल्या लग्नाच्या वरातीत नवरीच्या दारात पोहोचतो तेव्हा तो अनोख्या पद्धतीने Entry करतो. ज्यामुळे तो क्षण त्याच्यासाठी कायमच आठवणीत राहील. काहीजण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण ती गोष्ट तशीच न होता चुकीची घडते. आणि नंतर ते दृश्य पाहिल्यावर लोकांना आपलं हसू आवरत नाही. आता हा व्हिडिओ पहा ज्यामध्ये नवरा पूर्णपणे अनोख्या पद्धतीने Dance करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये पाहिलं तर नवरा एका मुलीसोबत जोरदार डान्स करताना दिसून येतोय. तो वेगळ्याच प्रकारे नाचत आहे. जे पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटते. हा व्हिडिओ नक्की कधीचा आणि कुठला आहे हे अजून कळू शकले नाही. परंतु, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करायचे सोडले नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणतात भाईसाहेब! तुला असं नाचताना लाज वाटत नाही का?
हा व्हिडिओ instagram वरील zindgi_ki_kahani11345667 नावाच्या अकाउंट वरून पोस्ट करण्यात आली आहे. या व्हिडिओ सोबत कॅप्शन मध्ये लिहिण्यात आले आहे की, हे काय होते. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने Comment केली "मी यासाठी माझा फोन रिचार्ज केला का?" तर दुसऱ्याने कमेंट केली की "मला काही समजत नाहीये हा पुरुष आहे की महिला!" तिसऱ्या युजरने म्हटले "भाऊ, मला काय पाहायचे आहे, मी आंधळा आहे हे चांगले आहे."
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.