Snake Viral Video: अबब.. कारच्या खाली लपून बसला १५ फूट लांब King Cobra, अधिकाऱ्याने हात लावताच सापाने... -VIDEO

King Cobra Viral Video: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
viral snake video
viral snake videotwitter

Snake Rescue Video: सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. साप आणि कोब्राचे व्हिडिओ लोकं पाहतात आणि शेअर देखील करत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

ज्यात कोब्रा कारच्या खाली लपून बसल्याचे पाहायला मिळत आहे. अंगाला काटा आणणारा हा व्हिडिओ इंडीयन फॉरेस्ट सर्व्हिसच्या एका अधिकाऱ्याने शेअर केला आहे.

viral snake video
Ulhasnagar Viral Reel News | रील करण्याच्या नादात जीव घातला धोक्यात, पोलिसांनी शिकवला धडा

हा व्हिडिओ शेअर करत त्या अधिकाऱ्याने लिहिले की, ' नैसर्गिक समतोल राखण्यासाठी किंग कोब्रा या निसर्गात असणं खूप गरजेचं आहे. १५ फूट लांब किंग कोब्राला वाचवून जंगलात सोडण्यात आलं आहे. ही सर्व प्रक्रिया अनुभवी लोकांनी केली आहे. त्यामुळे याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. पावसाची सुरुवात होणार असल्याने हे साप कुठेही आढळून येऊ शकतात.'

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,साप पकडण्यात तरबेज असलेला व्यक्ती त्या १५ फूट लांब कोब्राला पकडताना दिसून येतोय. हातात असलेल्या दांड्यासह तो अनेकदा हातानेही त्याला पकडताना दिसून येत आहे.

पकडल्यानंतर तो त्याला एका पिशवीत भरतो आणि घेऊन जातो. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने लिहिले की, ' या सापाला जंगलात सोडण्यात आलं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.' (Viral Video)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्या अधिकाऱ्याचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, ' किंग कोब्रा भारताची शान आहे. मात्र मानवाने त्याच्यावर अत्याचार केला आहे. मानवाकडून होत असलेल्या कृत्यामुळे त्यांचं अस्तित्व संपुष्टात येऊ लागलं आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com