Viral Video: छेड काढणाऱ्या तरुणाला घडली जन्माची अद्दल! भररस्त्यात शाळकरी मुलीने धु धु धुतला; VIDEO

School Girl Beating Boy Shocking Video: अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही मुलींची छेड काढल्याचे प्रकार घडतात. अशा नराधमांना वेळीच शिक्षा देणे किती आवश्यक आहे, हेच दाखवणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
School Girl Beating Boy Shocking Video:
School Girl Beating Boy Shocking Video: Saamtv

महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महिलांवरील अत्याचार, छेडछाड, मारहाणीच्या घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही मुलींची छेड काढल्याचे प्रकार घडतात. अशा नराधमांना वेळीच शिक्षा देणे किती आवश्यक आहे, हेच दाखवणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळकरी तरुणीने छेड काढणाऱ्या मुलाला तुफान बदडल्याचे दिसत आहे.

शाळा, कॉलेजसमोर उभे राहून मुलींची छेड काढणे, अश्लिल कमेंट्स करणे, असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. अशा गावगुंडांमुळे शाळकरी मुलींना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र मुलींनी घाबरुन न जाता अशा लोकांना वेळीच अद्दल घडवणे आवश्यक आहे. अनेकदा मुलीही अशा तरुणांना चांगला चोप देतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एका शाळकरी मुलीने छेड काढणाऱ्या मुलाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. मुलाच्या टवाळखोरीला, रोजच्या छेडछाडीला वैतागलेल्या तरुणीने अक्षरशः त्या मुलाला चप्पलने बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तरुणीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

School Girl Beating Boy Shocking Video:
Andhra Pradesh: खळबळजनक! नोटांनी भरलेले वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी|VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळकरी ड्रेसमधील एक मुलगी तरुणाला बेदम मारहाण करत आहे. मुलीने त्याचे केस पकडून चप्पलने बदडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी मुलीच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याच्याही सुचना दिल्यात.

School Girl Beating Boy Shocking Video:
Sharad Pawar Speech: 'तुमचा पक्ष तुम्हाला लखलाभ', PM मोदींच्या ऑफरवरुन शरद पवारांचा टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com