Petrol Pump on 5th Floor : इमारतीच्या गच्चीवर पेट्रोल पंप; वाहनांमध्ये इंधन नेमकं कसं भरलं जातं? पाहा VIDEO

Viral Video : एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पेट्रोल पंप बनवण्याचा कारनामा चीनमध्ये करण्यात आला आहे.
Petrol Pump
Petrol PumpSaam TV

China Petrol Pump :

चीन नेहमीच वेगवेगळ्या आणि विचित्र इनोवेशनसाठी ओळखला जातो. जगाला चकीत करणाऱ्या गोष्टी नेहमीच चीन जगासमोर आणत असतो. चीनमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पेट्रोल पंप बनवण्याचा कारनामा चीनमध्ये करण्यात आला आहे.

या पेट्रोल पंपाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @TansuYegen नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा पेट्रोल पंप पाहून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येईल की गाड्या येथे पेट्रोल भरायला कशा येणार? मात्र त्याची देखील सोय येथे करण्यात आली आहे. (Viral Video)

Petrol Pump
Women Viral Video : रेल्वेत टीसीने विचारलं तिकीट कुठेय? महिलेच्या उत्तराने मन जिंकलं

इमारतीच्या छतावरील हा पेट्रोल पंप चीनच्या चोंगकिंगमध्ये बांधण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की पेट्रोल पंपावर काही वाहनांमध्ये इंधन भरले जात आहे. ही वाहने या पेट्रोल पंपापर्यंत कशी पोहोचली असा प्रश्न आता लोकांना पडला आहे.  (Latest News Update)

प्रत्यक्षात ही इमारत अत्यंत कमी उंचीची आहे. डोंगराळ भाग असल्याने प्रत्यक्षात ही इमारत खालच्या जमिनीवर बांधण्यात आली आहे. नीट पाहिल्यास या इमारतीच्या मागून एक रस्ता जात आहे, जो या इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या समांतर आहे.

Petrol Pump
Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून गणपती बाप्पाचा प्रवास, Video सोशल मीडियावर व्हायरल

चीनमध्ये बनवलेला हा पेट्रोलपंप इंजिनीअरिंगचं उत्तम उदाहरण आहे. चीनमध्ये असे अनेक युनिक स्ट्रक्चर पाहायला मिळतात. पाचव्या मजल्यावर पेट्रोल पंप उघडण्याची काय गरज होती असं अनेकांना वाटतं. पण पलीकडचा रस्ता बघितला की हा जुगाड किती विचारपूर्वक केला आहे हे लक्षात येतं. त्यामुळे या रस्त्यावरुन जाणारी वाहने सहज येथे इंधन भरू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com