Viral Video : रेल्वे रुळांवर तो बिनधास्त उभा राहिला; समोरून ट्रेन आली अन्... व्हिडिओ व्हायरल

Train Viral Video : व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक ट्रेन येणार असते. त्यामुळे फटकाचे दरवाजे बंद होतात. यामुळे दोन्ही बाजूकडील फाटकाच्या दरवाजाजवळ थांबतात.
Viral Video
Viral VideoSaam TV
Published On

Viral Video :

रेल्वे असलेल्या शहरांमध्ये रेल्वे फाटक देखील असतं. रस्त्याच्या मधोमध हे फाटक असतात. येथून ट्रेन येताना जाताना विशेष काळजी घेतली जाते. इन्लेक्ट्रीक पद्धतीने ट्रेन येण्याच्या काही वेळ आधीच हे फाटक बंद होते. त्यामुळे दोन्ही बाजूकडील नागरिक तेथून दूर उभे राहतात. आता सोशल मीडियावर याच फटकांमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

Viral Video
भांगेत कुंकू...हातात लाल चुडा, लग्नानंतर क्रिती खरबंदाचा पहिला लूक, डान्स करत सासरी केली एन्ट्री; VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओ पाहून हे फक्त भारतात होऊ शकतं असं तुम्ही देखील म्हणाल. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक ट्रेन येणार असते. त्यामुळे फाटकाचे दरवाजे बंद होतात. यामुळे दोन्ही बाजूकडील फाटकाच्या दरवाजाजवळ थांबतात. मात्र एक व्यक्ती फाटक ओलांडून रेल्वे रुळांच्या शेजारी जाऊन थांबतो. फाटक ओलांडल्यास येणारी रेल्वे जर जलद वेगात असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

मात्र तरीही हातात एक पिशवी घेऊन हा व्यक्ती येथे उभा असतो. तो जणू ट्रेनची वाट पाहत आहे असं वाटतं. येथे उपस्थित असलेल्या इतर व्यक्ती देखील त्या माणसाला पाहून चकित होतात. त्याला नेमकं काय करायचं आहे कुणालाच समजत नाही. थोड्यावेळाने ट्रेन येते. मोटारमन या व्यक्तीला पाहून ट्रेन थांबवतो. सर्वांना वाटतं या व्यक्तीचा जीव वाचवा त्यामुळे मोटारमनने ट्रेन थांबवली असेल. मात्र नंतर जे घडतं त्याने अनेकजण आपल्या कपाळाला हात लावतात.

तिथे उभा असलेला व्यक्ती हातात पार्सल घेऊन आलेला असतो. मोटारमन त्याला पाहून ट्रेन थांबवतो आणि आपलं पार्सल घेतो. ही सर्व दृश्य तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

एका इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून नेतकरी... देखील हैराण झालेत. या व्यक्तीने केलेल्या कामामुळे अनेक जण या व्हिडिओवर हसण्याचे ईमोजी पाठवत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत.

Viral Video
Street Food Viral Video: जबरदस्त! पराठा हवेत गरगर फिरला, अन् तव्यावर फिरला; हटके VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com