Parrot Quarrel in Marathi : पोपटाचं आपल्याच मालकिणीसोबत मराठीत कडाक्याचं भांडण, 'मिठू मिठू' व्हिडिओ एकदा बघायलाच हवा!

Parrot Talking in Marathi Video Viral : काही पोपट माणसं जसे बोलतात संवाद साधतात तसेच बोलू शकतात असं तुम्ही ऐकलं असेल. अशात सोशल मीडियावर पोपटाने मराठीमध्ये भांडण केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Parrot Quarrel in Marathi
Parrot Quarrel in Marathi Saam TV
Published On

Parrot Viral Video :

अनेक व्यक्ती आपल्या घरी कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी पाळतात. काही व्यक्तींना प्राण्यांपेक्षा पक्षांची जास्त आवड असते. बरेचजण आपल्या घरी मिठू मिठू बोलणारा पोपट देखील पाळतात. काही पोपट माणसं जसे बोलतात, संवाद साधतात तसेच बोलू शकतात असं तुम्ही ऐकलं असेल. अशात सोशल मीडियावर पोपटाने मराठीमध्ये भांडण केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Parrot Quarrel in Marathi
Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा भररस्त्यात अफलातून डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) पाहून तुम्हीही चकीत व्हाल. यामध्ये एका मालकिणीने आपल्या पाळलेल्या पोपटाला पिजऱ्यात बंद करून ठेवलं आहे. तसेच पोपट सतत त्रास देत असल्याने ती मराठीमध्ये त्याला ओरडत आहे. तू जास्त शहाणा झालास का? असं महिला त्याला ओरडत आहे. त्यावर पोपट तिला म्हणतो की, तू लय बोलतेस का? मिठू मिठू ऐवजी पोपटाने थेट भांडण केल्याने सर्वांनाच त्याचं कौतुक वाटत आहे.

आपल्या पोपटाने केलेलं भांडण महिलेने कॅमेऱ्यात कैद केलं आहे. दोन महिला एकमेकींशी भांडण करताना जशा बोलतात तसंच हा पोपट बोलत आहे. तसेच रागारागात पिंजऱ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. @nikku__7020 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ते सगळं राहुद्या त्या पोपटाला आता बाहेर सोडून द्या असं एकाने लिहिलंय. तर आणखी एकाने पोपटाला एवढं कधी शिकवलं. आम्हाला सुद्धा असा पोपट हवा आहे, असं म्हटलंय.

अहो ताई आमच्या कडे पण पोपट आहे. त्याचं नाव सिद्धू आहे. तो पण खूप बोलतो त्याला तुमचा व्हिडिओ दाखवला तर तो तिला विचारत होता कुठं आहेस गं तू, खूप छान वाटलं, अशीही कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. महिलेच्या बोलण्यानुसार मादी पोपट असल्याचे समज आहे.

Parrot Quarrel in Marathi
Viral Video : पाण्यात पोहण्यासाठी गेला, मासा समजून त्याने साप पकडला; पुढे जे घडलं ते भयंकरच...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com