सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना जेवण बनवण्यासाठी फार वेळ नसतो. त्यात महागाई देखील इतकी वाढली आहे की स्वस्तात मस्त आणि झटपट काय बनवावं असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी एकदम खास आहे. ही रेसिपी अवघ्या 5 मिनिटांत शिजून तयार होते.
महाराष्ट्रात तुम्ही नेहमीच हिरवे वाटणे म्हणजेच मटरची भाजी खाल्ली असेल. सिजनमध्ये मटर स्वस्त असले की सगळ्यांच्याच घरी याची भाजी बनवली जाते. आता सोशल मीडियावर याच मटरची एक मारवाडी स्टाईल रेसिपी समोर आली आहे. सहसा आपण मटरच्या शेंगा सोलून त्यातील मटर वेगळे करून घेतो आणि साली आपण फेकून देतो.
मात्र या व्हिडिओमध्ये महिलेने मटरच्या सालांची भाजी बनवली आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण साहित्य जाणून घेऊ.
साहित्य
मटरच्या साली
पाणी
जिरे
मोहरी
हिंग पावडर
धने पूड
लाल तिखट
चिरलेला कांदा
टोमॅटो
हळद
महिलेने या व्हिडिओमध्ये मारवाडी स्टाईल रेसिपी असा उल्लेख करत ही रेसिपी बनवली आहे. यामध्ये तिने सर्वात आशी मटरच्या साली हलक्या हाताने पुन्हा सोलून घेतल्यात. त्यानंतर एका पाण्याच्या वाफेवर त्या वाफवून घेतल्यात. साल नरम होईपर्यंत वाफवून घ्यावी.
पुढे एका भांड्यात तेल गरम करून घ्यावे. यात जिरे, मोहरी आधी टाकावी. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो आवडीनुसार टाकू शकता. हिंग, लाल तिखट, धने पूड, हळद आणि चवीनुसार मिठ टाकून घ्यावे. त्यानंतर वाफवून घेतलेल्या साली यात टाकाव्यात. पुढे 5 मिनिटांत ही भाजी खाण्यासाठी तयार.
@jho_kitchetn_23 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जर तुम्हाला देखील जास्तीत जास्त सेविंग करायचे असेल तर ही भाजी परफेक्ट आहे. अशाच प्रकारे डोक्याची देखील भाजी केली जाते. अनेक व्यक्ती दोडक्याची साल फेकून देतात मात्र त्याची चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.