Delhi Metro Viral Video: आता हेच पाहायचं राहिलं होतं; दिल्ली मेट्रोत लिपस्टिक अन् साजश्रृंगारात तरुणाची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Viral Video: डीएमआरसीने ही अनेकदा लोकांना असं वागू नका असं आवाहन केलं आहे.
Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral VideoSaam TV
Published On

Delhi Metro Viral Video:

दिल्ली मेट्रोशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात . कधी मेट्रोत मजेदार गोष्टी घडतात तर कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो. डीएमआरसीने ही अनेकदा लोकांना असं वागू नका असं आवाहन केलं आहे. मात्र रील बनवण्याच्या नादात लोक कोणत्याही थराला जातात. असाच दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झालाय.

Delhi Metro Viral Video
Nanded Crime News: विमा एजंट बनून आला अन् महिलेच्या घरात शिरला; मारहाण करत सोन्याचे दागिने, मोबाइल घेऊन फरार, परिसरात खळबळ

या व्हिडिओमध्ये एक तरुण बिंदी, कपाळावर सिंदूर आणि ओठांवर लिपस्टिक लावून फिरत आहे. दिल्ली मेट्रोत आत येताच सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. त्याने आपल्या अशा ड्रेसिंगमुळे लोकांना आश्चर्यचकित केल आहे. त्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हिडिओमध्ये सुरुवातीला सिंदूर, लिपस्टिक आणि बिंदी घालून एका व्यक्तीची मेट्रोमध्ये एंट्री होते. त्यानंतर तो प्रवाशांमध्ये उभा राहतो. पुढे तो एका महिला प्रवाशाला तिच्या सीटवरून उठवतो. महिला प्रवासी तिला काहीच समजत नसल्याने तिची सीट सोडते.

त्यानंतर तो माणूस तिथे बसतो. परंतू तो मेट्रोत वृध्द व्यक्तीनंसाठी तसंच गरोदर महिलासाठी असलेल्या सीटवर बसतो. त्यामुळे त्याचे हे वागणे काही व्यक्तींना अजिबात आवडत नाही. तरुणाची स्टाईल पाहून अनेक प्रवासी हसताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला तरुणाचा हा व्हिडिओ @rkramaad_oo9 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. प्रत्येकजण या व्यक्तीला जोरदार ट्रोल करत आहे.

एका यूजरने लिहिले की, अशा व्यक्ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. तसंच दुसऱ्या युजरने लिहिले की, हे जे त्यानं केलं ते अजिबात योग्य नाही. परंतू दिल्ली मेट्रोमधील लोकांच्या विचित्र वागण्याचा व्हिडिओ यापूर्वीही अनेकदा व्हायरल झाले आहेत.cr

Delhi Metro Viral Video
Crime News : पाेलीसांनी वाचवला मुलाचा जीव, महिलेसह ६ अटकेत; गुप्तधनासाठी रचला हाेता नरबळीचा कट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com