जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. मानवाने अनेक गोष्टींचा शोध लावला आहेतच. टेक्नॉंलॉजीचा , ऐतिहासिक, भौगोलिक शोध मानवी शोध कार्य चालूच असतं. काही जण असे आहेत की, त्यांच्या कार्याला सलाम करावा असं वाटतं.
जपानच्या विद्यार्थ्यांनी अशीच काहीशी कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांनी थेट आकाशात उडणारी सायकल बनवली आहे. सध्या आकाशात उडणारी सायकल नेटकाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सायकलचं पेंडेल चालवलं की, सायकल आकाशात उडू लागते या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे.
जपानच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ही अनोखी सायकल शोधून काढलीये. व्हिडीओतून आपण बघू शकतो की, या पाच विद्यार्थींनी सायकलला विमानासारखे पंखे लावले आहेत. मागील बाजूला फिरता फॅन लावलाय. त्यातील एक विद्यार्थी सायकलचे पेंडेल जोर-जोरात चालवतो आणि इतर तिघे जण सायकलला पुढे ढकलतात.
पुढे हवेच्या प्रवाहात सायकल आकाशात झेप घेते. सायकल चालवणारा विद्यार्थी जोर-जोरात पेंडेल चालवतो तस-तशी सायकल आकाशात उडू लागते. असा अनोखा शोध या विद्यार्थ्यांनी लावला आहे. सर्वत्र या विद्यार्थ्यांच कौतुक केलं जातं आहे. @BUSINESSHUB.MARATHIयांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला असून आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला खळखळून हसवतात तर काही अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा काही तरी नवीन करण्याची जिद्द देतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.