'Digital India'चा डिजिटल भिकारी; QR कोडने मागितली भीक Video व्हायरल

'Digital beggar' Video: सोशल मीडियावर एका भिकाऱ्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात हा भिकारी डिजिटल इंडियाच्या मदतीने भीक मागत आहे.
'Digital beggar' Video
'Digital beggar' Video
Published On

'Digital Beggar' Video:

देशात डिजिटल पेमेंटचा वापर वाढवलाय. सर्वत्र ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी डिजिटलचा पेमेंटचा उपयोग केला जातो. भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या शोरुममध्ये डिजिटल पेमेंटचा उपयोग केला जातो. इतकेच नाही भिकाऱ्याकडून सुद्धा या डिजिटल पेमेटचा वापर केला जातो. हो, तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे, आणि बरोबर सुद्धा. जर तुम्हाला अजून विश्वास बसत नसेल तर याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. (Latest News)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भिकारी QR कोडसह भीक मागत आहे. व्हिडिओमधील भिकाऱ्याला डोळ्यांनी दिसत नाहीये. पण भीक देताना त्याची कोणी फसवणूक करू नये, यासाठी त्याने संपूर्ण व्यवस्था केलीय. ते कसं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक अंध व्यक्ती कारमध्ये बसलेल्या व्यक्तीजवळ येतो आणि पैसे मागू लागतो. त्या व्यक्तीच्या गळ्यात QR कोड आहे. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने विचारले की तुम्ही ऑनलाइन पैसेही घेता का? तेव्हा भीक मागणारी व्यक्ती हो असं म्हणते, असं आपल्याला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

यानंतर, कारमध्ये बसलेली व्यक्ती क्यूआर कोड स्कॅन करतो आणि पैसे ट्रान्सफर करतो.मग भिकारी त्याचा फोन काढतो आणि त्याच्या खात्यात खरोखर पैसे आले आहेत की नाही हे तपासतो. खात्यात पैसे आल्याची माहिती त्या अंध व्यक्तीला मोबाईलच्या आवाजातून मिळते. कारमधील व्यक्ती पैसे मिळालेत का असा प्रश्न करतो त्यावेळी भीक मागणारी व्यक्ती हो असं उत्तर देते. दरम्यान हा व्हिडिओ @somanigaurav नावाच्या X खात्यावरून शेअर करण्यात आलाय.

व्हिडिओ शेअर करण्यात आला असून गुवाहाटीमध्ये एक अप्रतिम दृश्य दिसल्याचे लिहिले आहे. एक भिकारी फोन पे वापरणाऱ्या लोकांकडून पैसे मागत आहे. खरंच तंत्रज्ञानाला मर्यादा नाहीत. दशरथ असे या भिकाऱ्याचे नाव सांगण्यात येत आहे.

'Digital beggar' Video
BJP MLA Viral Video: मित्राला मिळालं लोकसभेचं तिकीट, भाजप आमदाराने केला जोरदार डान्स; Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com