Unique Story: मनामनात राम ! मुलं २ वर्षांची होताच अंगावर गोंदवलं जातं 'राम', अनोख्या समाजाची अनोखी संस्कृती

Ramnami Commnity Culture: छ्त्तीसगडमधील जंजगीर-चंपा या गावातील चारपारा येथे राहणाऱ्या रामनामी समाजातील लोकांनी संपुर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवले आहे. या समाजासाठी राम हे फक्त नाव नसून त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे.
Ramnami Community
Ramnami Community Saam Tv
Published On

Ramnami Community Culture of tatto lord Rama On Full body:

येत्या २२ तारखेली अयोद्धेतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे देशभर भक्तिमय वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अयोद्धा दिवे, लायटिंग रांगोळ्यांनी सजलेली आहे. भाविका मोठ्या प्रमाणात अयोद्धेत दाखल होताना दिसत आहे. संपूर्ण जगात रामाचे भक्त आहेत. अनेक लोक रामाची भक्तिभावाने पूजा करतात. मात्र, छत्तीसगडमधील एका गावात लोकांनी चक्क आपल्या संपूर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवले आहे.

छ्त्तीसगडमधील जंजगीर-चंपा या गावातील चारपारा येथे राहणाऱ्या रामनामी समाजातील लोकांनी संपुर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवले आहे. या समाजासाठी राम हे फक्त नाव नसून त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. या भक्तांना रामनानी म्हणतात. शरीराच्या प्रत्येक भागावर रामाचे नाव, अंगावर रामनामीची (रामाचे नाव असलेली चादर), मोराच्या पिसाची पगडी आणि गळ्यात घुंगरु असे या लोकांचे राहनीमान आहे. या समाजातील प्रत्येक व्यक्ती, झाडात, वनस्पती आणि पर्यावरणात रामाचे नाव आहे, असे म्हटले जाते. (Latest news)

रामनामी समाजाचे लोक मंदिरात जात नाही. कोणत्याही मूर्तीची पूजा करत नाही. मात्र, संपूर्ण शरीरावर राम नाव गोंदवून रामाची भक्तिभावाने पूजा करतात. डोक्यापासून पायापर्यंत त्यांनी राम नाव गोंदवले आहे. त्यांच्या कपड्यांवरही रामाचे नाव लिहलेले असते. एवढेच नव्हे तर, त्यांच्या घराच्या भितींवरदेखील रामाचे नाव आहे. तसेच एकमेकांशी बोलताना हे लोक सर्वप्रथम रामाचे नाव घेतात. या समाजातील लोक बाळ २ वर्षाचे झाल्यावर त्याच्या अंगावर राम नाव गोंदवून घेतात. हे लोक कधीच खोटं बोलत नाही. मांसाहार करत नाहीत, ते फक्त रामाचे नामस्मरण करतात.

रामनाम समाजाची ओळख

डोक्यापासून पायापर्यंत रामाचे नाव रामनामी समाजाने गोंदवून घेतले आहे. अंगावर रामनामाची चादर, मोरपिसांची पगडी आणि घुंगरु ही या लोकांची ओळख आहे. १०० वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. रामनानी समाजाने सुरु केलेल्या या सोसायटीची स्थापना १८९० च्या सुमारास झाली.

Ramnami Community
Viral Video: किचनमध्ये उंदरांचा सुळसूळाट; त्यातच आचऱ्याने बनवलं जेवण, VIDEO पाहून बाहेरच खाण विसरुन जाल

समाजाची सुरुवात कशी झाली?

मुघलांच्या काळात रामनामी समाजाची स्थापना झाली. जेव्हा मुघलांनी भारततील मंदिरे पाडण्यास सुरुवात केली तेव्हा या समाजाच्या लोकांनी मुघलांना विरोध केला होता. त्यांनी राम मंदिरे उद्धवस्त करु रामाऐवजी आमची पूजा करण्याचा आदेश दिला होता. जेव्हा लोकांनी हा आदेश पाळण्यास नकार दिला तेव्हा मुघलांनी या लोकांचा छळ केला. त्याचा निषेध म्हणून या समाजातील लोकांनी संपूर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवले जाते.

Ramnami Community
Viral Video: पुण्यात सिग्नलवर विचित्र अपघात; चूक डंपरवाल्याची की बाइकवाल्याची? VIDEO बघा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com