VIDEO: लाडकी बहीण योजनेवरील Ravi Rana यांच्या त्या वक्तव्यावर Yashomati Thakur यांची सडकून टीका

Yashomati Thakur on Ravi Rana News: लाडकी बहीण योजनेवरुन रवी राणा यांचं खळबळजनक वक्तव्य, यशोमती ठाकूर यांची सडकून टीका.

आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयाचे 3 हजार करू, या निवडणुकीत मला तुमचा आशीर्वाद हवा. जर मला आशीर्वाद दिला नाही, तर मी तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेईन असं खळबळजनक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं. त्यावर आता काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले आहेत. या वक्तव्याने राणा दाम्पत्याचा मूळ स्वभाव समोर आला आहे. राणा दाम्पत्य ब्लॅकमेलर आहेत, त्यांनी हे वक्तव्य मजाक मजाक मध्ये केलेलं नाही. रोज तुम्ही करता तेच तुमच्या जिभेवर येत असतं. असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. राणा दाम्पत्याचा स्वभाव ब्लॅकमेलिंगचा आहे हे सिद्ध झालं आहे. निवडणूक झाली की ही योजना बंद होणार असून हे कॅश फॉर वोट चे उत्तम उदाहरण आहे. हे सरकार असंविधानिक सरकार आहे तसेच टक्केवारी व ब्लॅकमेलिंग सरकार आहे. असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com