Nawab Malik VIDEO: महायुतीच्या विरोधामुळे मलिक अपक्ष निवडणूक लढणार?

Nawab Malik News: नवाब मलिक हे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता, मलिक हे सध्या जामिणावर बाहेर, गोवावाला कंपाऊंड प्रकरणात ईडीकडून मलिक यांना करण्यात आली होती अटक.

नवाब मलिक हे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीच्या विरोधामुळे मलिक अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक दिसून आले होते. नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात देखील सत्ताधारी बाकांवर नवाब मलिक बसलेले पाहायला मिळाले होते. याला भाजपने जोरदार विरोध केला होता. नवाब मलिक हे सध्या जामिणावर बाहेर असून गोवावाला कंपाऊंड प्रकरणात ईडीकडून मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडून नवाब मलिक यांचा विरोध करण्यात येत होता. तर आता नवाब मलिक हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com