Eknath Shinde News: Shrikant Shinde यांना मंत्रिपद का दिलं नाही,मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण!

शिंदे गटाच्या वाट्याला एक मंत्रिपद आले आहे, पण श्रीकांत शिंदे मंत्री झालेले नाही. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आज नरेंद्र मोदीसह इतर नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. पण श्रीकांत शिंदे यांचे नाव वगळण्यात आले आहे. श्रीकांत शिंदे मंत्री का नाही झाले यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रतापराव जाधव हे शिंदे गटातील वरिष्ठ नेते आहेत आणि ते मंत्रिपदाला न्याय देतील असे शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांनी पक्षाचे कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे असले तरी पक्षाच्या वरिष्ठांना संधी देण्यात आली आहे असेही शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com