Vinayak Raut Video: Narayan Rane यांच्या विजयावर विनायक राऊतांचा आक्षेप
सिंधुदुर्ग, रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते नारायण राणे हे निवडून आले आहेत. त्यांच्या विजयावर आता ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. नारायण राणे हे भ्रष्ट माग्राने निवडून आले असून त्यांची निवड रद्द करावी. तसेच त्यांना 5 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. नारायण राणेंच्या लोकांनी ईव्हीएम मशीन प्रत्येकाच्या घरी घेऊन जाऊन, धमकावून आणि पैसे देऊन मतदान करुण घेतल्याचा संदर्भ या नोटीस मध्ये दिल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.