VIDEO: SRA प्रकरणी Vijay Wadettiwar यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप
SRA ची निर्मिती झाली तेव्हा अभियंत्यांकडून रिटायरमेंट पर्यंत त्यांना SRA मध्ये ठेवावं अशा प्रकारच्या फाईलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही केली असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ही नियमाची पूर्णतः पायमल्ली करून कॅबिनेटच्या पुढे जाऊन निर्णय घेतला असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. प्रचंड मोठी रक्कम खर्च करून हा महागोटाळा केला असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सर्वांना परमनंट SRA मध्ये रिटायरमेंट पर्यंत ठेवावं अशा प्रकारच्या फाईल वर माननीय मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे. हे शासनाचं नुकसान आहे. हे सर्व अभियंते म्हाडातून पेमेंट घेत असल्याचही वडेट्टीवार म्हणाले
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.