Video : अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सेरेमनीची ६५ वर्षांपासूनची परंपरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज अटारी बॉर्डरवर बीटींग द रिट्रिट सोहळ्याचा देशवासीयांनी आनंद घेतला. ६५ वर्षांपासूनची ही परंपरा आजही जपली जात आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुवारी अटारी-वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीट सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोहळा सुरू होण्यापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पंजाबच्या संस्कृतीवर आधारित कार्यक्रम तसेच तेथील गाणी सादर करण्यात आली. उपस्थित लोक हिंदुस्थान जिंदाबाद आणि भारत माता की जयच्या घोषणांनी बीएसएफ जवानांना प्रोत्साहन देत होते. बीटिंग द रिट्रीट सिरेमनीची सुरुवात १९५६ मध्ये झाली होती. दररोज संध्याकाळी दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज समारंभाने उतरवले जातात. या कार्यक्रमात भारताचे बीएसएफचे जवान आणि पाकिस्तानचे पाक रेंजर्स सहभागी होतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.