Video: यशश्री शिंदे प्रकरणात मोठी अपडेट
Uran Crime: उरण तालुक्यातील यशश्री शिंदे हिची 25 जुलै रोजी हत्या करण्यात आली होती. 26 जुलै रोजी यशश्रीचा मृतदेह उरण मधील मुख्य रस्त्या शेजारी असणाऱ्या पेट्रोल पंपच्या मागील बाजूस आढळून आला होता. अतिशय विच्छीन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. 27 जुलै रोजी पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाची सूत्र वेगाने हलवली. नवी मुंबई पोलीसांनी 8 ते 9 पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु केला. आरोपी हा केवळ कर्नाटक मधील रहिवासी आहे एवढीच माहिती पोलिसांकडे होती. मात्र मयत आणि आरोपी यांचा मित्र मोहसीन याने आरोपीबाबत माहिती दिली आणि पोलीसांनी सापळा रचत मुख्य आरोपी दाऊद शेख याला अटक केली. याच प्रकरणात आता मोठी अपडेट आलीये. यशश्री शिंदे हिचा मोबाईल पोलीसांना सापडला. उरण बेलापूर रेल्वे मार्गा लगत करण्यात आलेल्या शोध मोहिमे दरम्यान सापडला मोबाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.