Maharshtra Rain News | पुढील दोन ते तीन तासांत अवकाळी पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात पडणार का?

राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा ४० च्या वर गेला आहे. पण पुढच्या काही तासांत अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. उन्हामुळे नागरिकांची लाही लाही झाली आहे. हा पाऊस पडला तर सर्वसामान्यांची उकाड्यापासून सुटका होईल.

राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा ४० च्या वर गेला आहे. पण पुढच्या काही तासांत अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, हिंगोली आणि कोल्हापुरात हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. उन्हामुळे नागरिकांची लाही लाही झाली आहे. हा पाऊस पडला तर सर्वसामान्यांची उकाड्यापासून सुटका होईल. पण हाच पाऊस शेतकऱ्यांना नुकसानदायकही ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. विजांच्या गडगडाटासह हा पाऊस होईल आणि ताशी २० ते ३० किलोमीटरने वारे वाहतील असा अंदाजही पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com