VIDEO : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

Shivsena Udhav Thackrey Dasra Melava : ठाकरे गटाचा शनिवारी परांपरेनुसार दसरा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्कवर मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

ठाकरे गटाचा उद्या परांपरेनुसार दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी शिवाजी पार्कवर आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दसरा मेळावा पार पडत असल्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरवर्षी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. पक्ष फोडीच्या राजकारणानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन दसरा मेळावे घेण्यात येतात. उद्या शुक्रवारी शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागलेले असताना आता या दसरा मेळाव्यातून ठाकरे आपल्या भाषणातून काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्टेज बांधून तयार झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिवसैनिकाला बसण्यासाठी हजारोंच्या संख्येने आसन व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. उद्या आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे शिंदे सेना आणि भाजपवर कशी टीका करणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com