Uddhav Thackeray On BJP | उद्धव ठाकरे भाजपवर बरसले; राजकीय आखाडा थेट क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचला!

भाजप घटनाबाह्य सरकार सरकार आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. दुप्पट मालमत्ता कर लावला जातो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. आमचं सरकार आल्यावर कराच्या जाचातून सुटका करु, असं आश्वासनही ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिले. ते पनवेलमध्ये बोलत होते.

पनवेलच्या ४ नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटण्यास त्यांचे पुत्रप्रेम कारणीभूत असल्याची टीका अमित शहा यांनी केली होती. त्या टीकेला यावेळी ठाकरेंनी उत्तर दिले. शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारताने वर्ल्डकप गमावला, असं ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com