Varun Sardesai : वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीवरून मविआत ठिणगी? वांद्रे पूर्वसाठी ठाकरेंच्या विश्वासूंना उमेदवारी घोषित, VIDEO

Varun Sardesai News : वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीवरून मविआत ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. वांद्रे पूर्वसाठी ठाकरेंच्या विश्वासूंना उमेदवारी घोषित केली आहे.

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. मात्र महाविकास आघाडीचं अजून जागा वाटप निश्चित झालं नसतानाच ठाकरे गटाने वांद्रे पूर्वसाठी वरुण सरदेसाईंच्या नावाची घोषणा केलीय....त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यताय.

2019 मध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दिकींनी वांद्रे पूर्वमधून विजय मिळवला होता. मात्र झिशान सिद्दिकींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केलीय. त्यांचा केवळ अधिकृत पक्षप्रवेश तेवढा बाकी आहे. तर वांद्रे पूर्वची जागा काँग्रेसची असताना ठाकरे गटाने वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा केलीय..त्यामुळे या मतदारसंघात झिशान विरूद्ध वरून असाच सामना रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. वरुण सरदेसाई कोण आहेत? पाहूयात.

कोण आहेत वरुण सरदेसाई?

वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ

वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेच्या सचिवपदाची जबाबदारी

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सर्वच जागा जिंकण्यात यश

वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक

महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित झालं नसतानाच ठाकरे गटाने पहिला उमेदवार घोषित केलाय.. त्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र काँग्रेस वांद्रे पूर्ववरचा दावा सोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र काँग्रेसने दावा सोडल्यास झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई असाच थेट सामना होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com