Uday Samant Support to Narayan Rane: मोठी राजकीय घडामोड! उदय सामंतांचा नारायण राणेंना पाठिंबा, पाठिंब्याचं कारणंही सांगितलं

Maharashtra Election 2024: एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उदय सामंन यांनी नारायण राणे यांना पाठिंबा देत असल्याचा जाहीर केलं. उदय सामंत यांनी पाठिंबा जाहीर करतात नारायण राणे यांनाही भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कोकणातील महत्त्वाचे नेते उदय सामंत यांनी अखेर दोन पावलं माघार घेत नारायण राणे यांना पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी त्यांचे बंधू किरण सामंत हे देखील उपस्थित होते. एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उदय सामंन यांनी नारायण राणे यांना पाठिंबा देत असल्याचा जाहीर केलं. उदय सामंत यांनी पाठिंबा जाहीर करतात नारायण राणे यांनाही भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील महायुतीचा उमेदवार कोण असणार यावरून अनेक दिवस तर्क वितर्क लढवले जात होते. या सगळ्या चर्चांना अखेर आता पूर्णविराम मिळालाय. नारायण राणे यांना भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र तूर्तास त्यांनी माघार घेतल्यामुळे आता नारायण विरुद्ध विनायक राऊत अशी लढत तळकोकणात पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com