Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडी ॲक्शन मोडवर; १० ठिकाणी मारले छापे | VIDEO

ED Raid On Torres Company : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीच्या कार्यालयांवर ईडीने छापे मारले आहे.

टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडी ऍक्शन मोडवर आला असल्याचं बघायला मिळत आहे. ईडीने टोरेस घोटाळा संदर्भात १० ठिकाणी छापे मारलेले आहेत. यात मुंबई, नवी मुंबई, जयपूरसह इतर १० ठिकाणी हे छापे मारलेले आहेत. टोरेसने या शहरांमध्ये मोठे शोरूम उघडून वेगवेगळ्या मोठ्या परताव्याच्या गुंतवणुकीचं आमिष गुंतवणूकदारांना दाखवलं होतं. हा सर्व घोटाळा समोर आला तेव्हा टोरेसच्या दादर इथे असलेल्या मुख्य कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी एकच गर्दी केलेली होती. त्यात वेगवेगळ्या स्कीम त्यांनी लोकाना सांगितल्या होत्या. त्यातून त्यांनी गुंतवणूक स्वीकारली होती. ज्यांनी हा घोटाळा केला ते सगळे युक्रेनचे नागरिक होते. घोटाळा केल्यानंतर हे सगळे कोट्यवधीची रक्कम घेऊन पसार झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात ईडीने मनी लॉंड्रिंगच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता तपास करत ईडीने छापेमारी सुरू केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com