Top 10 Headlines : विरोधकही राहणार नाहीत, बीडमध्ये जमावबंदी... वाचा १ वाजताच्या टॉप १० हेडलाइन्स | Video

14th January Top 10 Headlines : इंडिया आघाडीसंदर्भात संजय राऊत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आघाडी राहिली नाही तर विरोधकही राहणार नाहीत, असं राऊत म्हणाले. दुसरीकडे बीडमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. इतर १० महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर.

- इंडिया आघाडी तुटलेली नाही. आघाडी राहिली नाही तर विरोधकही राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. काँग्रेसनं नेतृत्व करण्याचीही केली मागणी.

- बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू केली असून मोर्चा, धरणे आंदोलनाला मनाई.

- ठाकरेंच्या शिवसनेची काँग्रेस झालीय. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचे खडेबोल, सूत्रांची माहिती.

- बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा, शिवसेनेच्या बैठकीत ठराव मंजूर.

- भारताला खरं स्वतंत्र राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतरच मिळालं, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य.

- टोरेस घोटाळ्यात ईडीची एन्ट्री, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीला सुरुवात. आत्तापर्यंत 2 हजार जणांकडून गुन्हा दाखल.

- नायलॉन मांजा वापरल्या प्रकरणी 7 मुलांचे पालक अटकेत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. राज्यातील पहिलीच कारवाई.

- ICMRचं पथक बुलढाण्यात दाखल होणार, टक्कल पडण्याच्या कारणांचा घेणार शोध.

- अधिकाऱ्याला वैतागून नागरिकांनी पाडला चक्क नोटांचा पाऊस. गुजरातमधल्या अनोख्या निषेध व्हिडिओची चर्चा.

- 144 वर्षानंतर होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये मोठी गर्दी, शाही स्नानासाठी साधू-संत, भाविक एकत्र.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com