VIDEO: Sambhaji Raje Chhatrapati यांचा चलो विशाळगडचा नारा, हजारो शिवभक्तांसह विशाळगडाकडे होणार रवाना

Sambhaji Raje on Vishalgad Fort News: संभाजी राजे छत्रपती यांचा चलो विशाळगडचा नारा, कोल्हापुरातून हजारो शिवभक्त विशाळगडाकडे जाण्यास सज्ज.

विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत गेल्या कित्येक दिवसापासून शिवभक्तांचं आंदोलन सुरु आहे. विधान भवनाच्या बाहेर देखील शिवभक्तांकडून आंदोलन करण्यात आलं होत त्यावेळी शिवभक्त आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. पोलीसांकडून काही आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आलं होतं. तर आता संभाजी राजे छत्रपती यांनीच चलो विशाळगडचा नारा दिला आहे. विशागडावरील अतिक्रमणा विरोधात हजारो शिवभक्त विशाळगडच्या दिशेने जाण्यास सज्ज झाले आहेत. कोल्हापूरातील भवानी मंडप परिसरात संभाजी राजे यांच्या हस्ते भवानी मातेची आरती होणार असून त्यानंतर शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com