Special Report | मुंबईत नोकरी, मात्र मराठी माणसाला 'नो एन्ट्री', गुजराती कंपनीचा मराठी विरोधी फतवा?

Mumbai News Today | मुंबईत कशा प्रकारे मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळत नाही. याबाबत आपण नेहमीच वाचत, पाहत असतो. आता सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका HR रिक्रूटरने लिंक्डइनवर नोकरीची माहिती देणारी पोस्ट केली.

मुंबईत कशा प्रकारे मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळत नाही. याबाबत आपण नेहमीच वाचत, पाहत असतो. आता सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका HR रिक्रूटरने लिंक्डइनवर नोकरीची माहिती देणारी पोस्ट केली. मात्र यामध्ये Marathi people are not welcome here असं लिहिल्यामुळे नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत. काय आहे पोस्टमध्ये? एका फ्रीलान्स HR रिक्रूटरने मुंबईतील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझाईनर हवा आहे अशी पोस्ट केली आहे. यासाठी जॉब लोकेशन गिरगाव आहे. तसंच पगार 4.8 LPA एवढा असल्याचं यात सांगितलं आहे. यानंतर इतर माहितीमध्ये कँडिडेटकडे कोणते स्किल्स असायला हवेत याबाबत माहिती दिली आहे. मात्र यासोबतच मराठी लोकांना अप्लाय करता येणार नसल्याचंही याठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं आहे. यामुळेच या लिंक्डइन पोस्टचा स्क्रीनशॉट एक्स आणि इतर सोशल मीडिया हँडल्सवर व्हायरल होतो आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मात्र रिक्रूटरने सोशल मिडियावर माफी मागितली आहे. अनेक मराठी भाषिकांचं मन दुखावलं या बद्दल त्यांनी माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com