VIDEO: आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारच वाढवू शकतं! Uddhav Thackeray यांचं मोठं विधान

Uddhav Thackeray on Reservation News: मुंबईत महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा, मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांचं आरक्षणासंदर्भात महत्त्वाचं विधान.

मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलं आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं विधायक लोकसभेत मांडा आम्हा त्याला पाठिंबा देऊ असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांनी भूमिका स्पष्ट करा असं म्हणत गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आंदोलकांनी विरोधकांच्या बंगल्यावर मोर्चे काढले होते. या सगळ्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांनी हे महत्त्वाचं विधान केलं आहे. शिवाय आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्यसरकारला नसून तो अधिकार फक्त लोकसभेला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com