VIDEO: पुण्यातील पूरजन्य परिस्थितीवरुन Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा

Supriya Sule on Flood News: पुण्यात पावसामुळे पूराचा कहर, अनेकांचे संसार उद्धवस्त.

पुण्यात पावसामुळे पूराचा कहर पाहायला मिळाला. नागरिकांना पूर्वकल्पना न देता खडकवासला धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पुणे शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेसंदर्भात भाजप मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात अनेकांचे संसाद उद्धवस्त झाले याला जबाबदार महाराष्ट्र सरकार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. थोडावेळ राजकारण, घरं फोडा पक्ष फोडा बाजूला ठेवा. आणि माणुसकी दाखवा असा खोचक सल्ला सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला आहे. तसेच संपुर्ण पुणे शहरासाठी वेगळं पॅकेज, सफाई, फवारणी, स्वच्छ पाणी, वीज, प्रत्येकाला आर्थिक मदत आणि पाण्याच्या टाक्या साफ करायची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com