Video: ... तर भाजपचा प्रचार करणार नाही? मावळमध्ये अजित पवार गटाच्या आमदाराचा थेट भाजपला इशारा!

Sunil Shelke On Bjp News: जर भाजप मावळमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसेल, तर राष्ट्रवादी देखील पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा प्रचार न करण्याचा ठराव करु शकते. असा थेट इशाराच अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यामध्ये आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अलबेल नसल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे. मावळ विधानसभेत घडाळ्याचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपने केलाय, तसं पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी ही करू शकते. असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपला दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com