Ajit Pawar In Baramati : बारामतीतून न लढण्याचे अजित पवारांचे संकेत !

Baramati Political News : बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आज जनता दरबार पार पडला. यावेळी लोकसभेच्या पराभवावर भाष्य करताना 'ही एकट्याची मक्तेदारी नाही, मतदार राजाला आपण बळजबरी करू शकत नाही.' अशी खंत व्यक्त केली.

एकदा बारामतीचा आमदार बदलला तर तुम्हाला कळेल. तुम्हाला न सांगता इतका विकास करतोय, असे म्हणत अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच विधानसभेला बारामतीतून न लढण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहेत. बारामतीत एवढे काम करून देखील लोकसभेला अजित पवार यांना लोकसभेला मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याची खंत त्यांनी आज बारामती दौऱ्यादारम्यान आयोजित शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनातल्या जनता दरबारात व्यक्त केली. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी होती.

यावेळी बोलताना 'माझ्या राजकीय कारकीर्दीला जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली, त्यामुळे मी एका कारखान्याचा संचालक ते आज वेगवेगळ्या पदावर काम करत आहे. मला जी संधी मिळाली ती कोणालाच मिळाली नाही, पाचव्यांदा मी उपमुख्यमंत्री पदावर काम करत आहे. माझा बारामतीचा विकास करत असताना कुठलाही स्वार्थ नाही. शेवटी ही काही एकट्याची मक्तेदारी नाही. मतदार राजाला आपण बळजबरी करू शकत नाही. असे 34 वर्षात अनेक अनुभव आले आहेत, पण मी कधी कोणाला बोलून दाखवत नाही, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com