Shirur Accident News | पुण्यानंतर शिरूरमध्ये अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला चिरडलं

Shirur Accident News Today | पुण्यानंतर आता शिरुरमध्ये देखील समोरून येणाऱ्या पिकअपने एका दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यानंतर शिरुरमध्ये एका अल्पवयीन मुलीनं दुचाकीस्वाराला चिरडलंय. एका पोलीस पाटलाच्या मुलीनं दोन तरुणांना जीपखाली चिरडलं आहे. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु या घटनेनं परिसरात एकच मोठी खळबळ उडाली आहे. अरुण मेमाणे असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर अपघातात महिंद्र बांडे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com