Sharad Pawar Jalna PC | "त्या उद्योगपती बद्दल मला माहित नाही", शरद पवारांनी थेट नाकारलं!

लोकसभा पहिली निवडणूक लढलो तेव्हा 4 लाख खर्च झाला होता आणि पहिल्या विधानसभेचा माझा खर्च 11 हजार होता. मात्र आता जो खर्च होतोय त्याला सीमा राहिली नाही.

Sharad Pawar Jalna PC | जालन्यात शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवारांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. आम्ही पार्लमेंटमध्ये असताना गैरसमज किंवा गैर प्रकार होत नव्हते, आज पार्लमेंटमध्ये गैर व्यवहार होतोय. लोकसभा पहिली निवडणूक लढलो तेव्हा 4 लाख खर्च झाला होता आणि पहिल्या विधानसभेचा माझा खर्च 11 हजार होता. मात्र आता जो खर्च होतोय त्याला सीमा राहिली नाही. ज्याच्या हातात सरकार आहे, ते निवडणुका हातात घेतायत अशी परिस्थिती देशात निर्माण झालीये असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी भाजपा मध्ये जाण्यासाठी एका उद्योग पतीच्या घरी बैठक झाली असं एका सभेत म्हटलं होतं याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, "याबाबत मला माहित नाही. ते कोण उद्योगपती आहे ते पण मला माहित नाहीत." आणखी काय म्हणालेत शरद पवार ते बघुयात...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com