Sharad Pawar On Nilesh Lanke |व्यासपीठावर बसायला खुर्ची उरली नाही म्हणून निलेश लंके...Video Viral

निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी अहमदनगरमध्ये सभा घेतली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार निलेश लंके हे सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

Sharad Pawar On Nilesh Lanke | निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी अहमदनगरमध्ये सभा घेतली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार निलेश लंके हे सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्यासपीठावर बसायला खुर्ची उरली नाही म्हणून निलेश लंके उमेदवार असूनही खाली मांडी घालून बसले होते. या साधेपणावर शरद पवारांनी स्तुतीसुमने उधळलीयेत. मंचावर नेत्यांची गर्दी झाल्याने बसायला खुर्च्या अपुऱ्या पडल्या. लंकेंना खुर्चीच उरली नाही. मग लंकेंनी कशाचाही विचार न करता मंचावरच एका कोपऱ्यात बसकन मारली आणि आपलं काम सुरु ठेवलं. त्यांच्या या कृतीनंतर शरद पवारांनी त्यांचं खूप कौतुक केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com