Sharad Pawar on Jarange Patil News | शरद पवारांचं भर सभेत जरांगेंसंदर्भात मोठं विधान!

जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन पुढे चालले आहेत, त्यांनी गरीब मराठ्यांसाठी काम केलं अशा शब्दांत शरद पवार यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केले. बीडमध्ये बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सभा घेतली.

जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन पुढे चालले आहेत, त्यांनी गरीब मराठ्यांसाठी काम केलं अशा शब्दांत शरद पवार यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केले. बीडमध्ये बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सभा घेतली. तेव्हा पवार म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची मी भेट घेतली होती. त्यांचे धोरण समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा मी त्यांना विनंती केली की राज्यातील सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य मजबूत करू. शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन जरांगे पाटील चालले आहेत असेही पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com