Maratha Resrvation : मराठा आरक्षणावर काय म्हणाले शंभुराज देसाई ?

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरावली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. ही त्यांच्या उपोष्णाची सहावी वेळ आहे.

मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे. हैदराबाद गॅजेट हा पहिला विषय होता. त्यानुसार हैदराबाद सरकारकडून सर्टीफाईड प्रती मागवल्या आहेत. मराठा समाजावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात देखील संबंधित अहवाल पोलिस अधिकाऱ्यांकडून सरकारकडे आलेले आहेत, अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली आहे. आम्ही विनंती करून देखील जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र त्यांचं आंदोलन सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हंटल आहे.

राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा तापत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरावली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाच्या पवित्र्यावर उत्तर देताना शंभुराज देसाई बोलत होते. ''सरकारकडून जरांगे यांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे. मी स्वत: जरांगे यांच्याशी फोनवर बोलून आंदोलनाची भूमिका घेऊ नका अशी विनंती केली होती. मात्र ते ठाम आहेत. हैदराबाद सरकारकडून सर्टीफाईड प्रती आम्ही मागवल्या आहेत. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात देखील संबंधित अहवाल पोलिस अधिकाऱ्यांकडून सरकारकडे आलेले आहेत,'' असं देसाई यांनी म्हंटल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com